परिशिष्ट 'क' - प्रथम अपील sampurn

परिशिष्ट 'क' - प्रथम अपील

माहितीचा अधिकार

⚖️ परिशिष्ट 'क' (भाग-१): प्रथम अपील

हा नमुना PDF मध्ये डाऊनलोड करा 👇

📥 अपील अर्ज Download करा
📚 प्रथम अपील: सविस्तर मार्गदर्शन
  • कधी करावे? जर तुम्हाला कलम ६(१) अंतर्गत केलेल्या अर्जाचे उत्तर ३० दिवसांत मिळाले नाही, किंवा मिळालेले उत्तर अर्धवट/चुकीचे/दिशाभूल करणारे असेल, तर तुम्ही प्रथम अपील करू शकता.
  • कोणाकडे करावे? प्रत्येक सरकारी कार्यालयात 'जन माहिती अधिकाऱ्या'पेक्षा वरिष्ठ पदावरील अधिकारी हा 'प्रथम अपीलीय अधिकारी' (First Appellate Authority) असतो. त्यांच्याकडे हा अर्ज करावा.
  • मुदत (Time Limit): ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर, पुढील ३० दिवसांच्या आत (म्हणजेच मूळ अर्जाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत) अपील दाखल करणे आवश्यक आहे.
  • शुल्क (Fees): महाराष्ट्रात प्रथम अपिलासाठी कोणतेही शुल्क नाही (₹ 0).
  • सुनावणी (Hearing): अपील केल्यानंतर तुम्हाला सुनावणीसाठी बोलावले जाते. तिथे तुम्ही तुमची बाजू मांडू शकता.
  • निकाल: प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने अपिलावर ३० दिवसांत (अपवादात्मक स्थितीत ४५ दिवसांत) निर्णय देणे कायद्याने बंधनकारक आहे.
💡 टीप: प्रथम अपील नेहमी 'रजिस्टर पोस्ट AD' ने पाठवावे किंवा कार्यालयात स्वतः देऊन त्याची पोहोच पावती (Acknowledgement) घ्यावी. ही पावती द्वितीय अपिलासाठी खूप महत्त्वाची असते.
प्रथम अपील अर्ज (नमुना 'अ')

(कलम १९(१) अन्वये)

प्रति,
प्रथम अपीलीय अधिकारी,
[येथे कार्यालयाचे नाव व पत्ता लिहा]

१. अर्जदाराचे पूर्ण नाव:
[तुमचे नाव]
२. संपूर्ण पत्ता:
[तुमचा पत्ता]
३. मोबाईल नंबर / ईमेल:
[संपर्क क्रमांक]
४. जन माहिती अधिकाऱ्याचे नाव व पद:
[ज्यांनी माहिती दिली नाही, त्यांचे नाव/पद]
५. मूळ अर्ज केल्याची तारीख: [तारीख]
६. अपिलाचे कारण (Grounds for Appeal):
(योग्य पर्यायावर टीक करा किंवा लिहा)
अ) विहित ३० दिवसांच्या मुदतीत माहिती मिळाली नाही.
ब) जन माहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारली.
क) दिलेली माहिती अपूर्ण / चुकीची / दिशाभूल करणारी आहे.
ड) जन माहिती अधिकाऱ्याने जास्त शुल्क मागितले आहे.
७. मागणी (Prayer / Relief Sought):
महोदय, कृपया जन माहिती अधिकाऱ्याला आदेश देऊन मला माझी माहिती त्वरित आणि विनामूल्य उपलब्ध करून द्यावी. तसेच माहिती देण्यास उशीर केल्याबद्दल योग्य ती कारवाई करावी.
८. सोबत जोडलेली कागदपत्रे:
१. मूळ अर्जाची झेरॉक्स प्रत.
२. १०/- रु. शुल्क भरल्याची पावती/पोस्टल ऑर्डर ची प्रत.

ठिकाण: ....................
दिनांक: ....................
आपला विश्वासू,

(सही)
[तुमचे नाव]
दिपक सुधाकर सूर्यवंशी
(माहिती अधिकार अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते)
संस्थापक, खान्देश प्रकाशन